RSS

...
A title i borrowed from the book Five Point Someone by Chetan Bhagat. it sums up most of what i believe in. Its funny how words and pictures sometime reveal more than the people themselves!
...

February 16, 2010

Studs in satara... ऊर्फ पप्पुचे लग्नं..!

आम्या मुंबईवरुन स्वत:ची गाडी, भाड्याचा चालक (diver ) व आभ्याला(गाय.) घेऊन शुक्रवारी(११ डिसेंबर) भल्या पहाटे ९:३० वाजता पुण्यात धडकला, म्हणजे पोचला. (पुण्यात गाडी घेऊन खरोखर धडकणं हा श्रीमंती षौक आहे!) शुक्रवारी भल्या पहाटे ७:३० वाजता पश्याने (माझा शाळेतला मित्र) झोपमोड केली, काय तर म्हणे क्रिकेट खेळायचा प्लॅन आहे. मी रात्री ४:३० वाजेपर्यंत कंपनीत खर्डेघाशी केल्याने क्रिकेट खेळणं तर दूरच, पण बघणं पण शक्य नव्हतं. पण अचानक पशाला क्रिकेट खेळायची कशी काय हुक्की आली देव जाणे!

मग मी त्याला समजावलं ते असं - हे बघ पश्श्या.. असा न तसा एकतर तू लवकर आऊट होतोस. बर सगळ्यांना बॉलिंग दिली पहिजे असा काही क्रिकेट्मधे नियम नाही..(How undemocratic!), मग तूझा खेळ क्षेत्ररक्षणापुरता मर्यादित राहतो.. बॅट्स्मनने मारलेला बॉलपण तूझ्याकडेच फार वेगाने येतो नाही; (मॅग्नॅटिक पर्सनलिटी, दुसरं काय?) तसा एखाद्याने चौकार मारण्याला तूझा विरोध अजिबात नाही, पण मग तो चेंडू सीमारेषेच्या थोडासाच बाहेर थांबावा अशी तुझी माफक अपेक्षा असते.. सीमारेषेपलिकडे (खरंतर अलिकडे पण) ५० मीटर पळणं हा वेळेचा तद्दन दुरुपयोग आहे. असो! ह्या विषयावर पश्याचा माझ्याशी मतभेद असल्याने तो खेळायला गेला....वर म्हणे, विन्या आला असता तर मला जरा मॉरल सपोर्ट मिळाला असता.. हम्मं.. तसाही नंतर सामन्याचा स्कोअर ऐकला तर एखाद्याला प्रश्न पडावा- हे क्रिकेट खेळले कि फूटबॉल? असो!

शुक्रवारी दुपारी ९:४० ला अखेर मी, आम्या, आभ्या आणि शशीतल (एकुण ५ हं!) पुण्यावरून कात्रज घाटातून NH4 ने साताय्र्याला निघालो. मधे शशीचा सातारी आग्रह न मोडता आम्ही व्यवस्थित चहापान केलं. सुरुवातीला आभ्याचे भ्रमणयंत्र (तब्बल दुसरया खेपेस) चोरीला गेल्यासंबंधी चर्चा व शेवटी शोकसभा झाली.. :D सगळेच जण आपापल्या क्षेत्रात काम करणारे कंत्राटी कामगार असल्याने गप्पा साहजिकच कोणाचं काय काम चालू आहे, अलिकडे किती SLA बुडाले, आजकाल ऑफशोअरची लोकं कामच करत नाहीत, मग त्याचा ऑनसाईट्च्या लोकांना कसा त्रास होतो अशा वळणाच्या होत्या. हल्ली कोणी जॉब बदलले, कोणाला किती मिळत असेल, कोणा संगणक-सुंदरींची लग्नं झाली ;) अशा गप्पा चालू होत्या. मधेच कोणाची कंपनी जास्त वाईट ह्यावर छोटासा वाद झाला.. (अशा वादात एकेकाळी आव्या जिंकायचा.. his first company was incredibly bad ;) )..शेवटी सगळ्यांच्याच कंपन्या वाईट हयावर सहमती झाली.

सातारय़ात शिरतानाच त्या शहराने एकदम आपली छाप टाकली.. खरंच फार सुंदर शहर!. छोटंसंच इन मीन ४ एक्झिट मधे संपतं, पण चकाचक! देखण्या जुन्या इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, मैदाने .. आणि हवामान तर एकदम झकास.. शहरात पोहचल्यावर आभ्या (इंग.) ला उच्चल्लं आणि विवाह स्थळाकडे प्रस्थान केलं. कार्यालय सातारय़ाच्या बाहेर असल्यानं शेवटच्या टप्प्यात (नेहमीप्रमाणे) रस्ता चुकलो. मग रीतीनुसार, गाडीतले ५ अभियंते ह्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट, CMM-I प्रोसेसेस आणि 6-sigma मेथडॉलॉजीज ह्यांचा close to २० वर्षांचा (५ जणांचा प्रत्येकी ४ वर्षे) अनुभव वापरला आणि आम्ही अखेर साई आशीर्वाद मंगल कार्यालय, लोणंद रोड येथे पोहचलो.. त्याआधी "Difficulty of path is exponentially proportional to number of stranger engineers in the car" असा आम्ही एक सिद्धांत मांडला, आणि तो लगेच सिद्धदेखील झाला… कारण आमचा मित्र शशिकांत जाधव लग्नाला रस्ता (जास्त) न चुकता पोहचला. पण तो त्याच्या गाडीत एकटाच होता… त्यामुळं बहुतेक ;)

पोहोचताच नवरदेव (आव्या.. सॉरी अविनाश :))ची भेट घेतली आणि म(निषा) वरुन थोडे टोमणे मारले.. :) वाटत होतं सगळं ठीक चाल्लंय पण गंडांतर न करेल तो अव्या कुठला! पठ्ठ्याचा बुट घरी विसरल्यानं श्रीवंदनाला उशीर झाला. आभ्यानं (गाय.) ही जिवाभावाच्या मित्राच्या लग्नात (एका डोळ्यात हसु व एका डोळ्यात अंसु) घेवुन बेफाम नृत्य केलं... आपण सगळे समझु शकतो त्याचे दु:ख! मग आव्यानेही मागे न राहता "जाओ तुम चाहे जहां, याद करोगे वहां" या दु:खमय गाण्यावर गणपती डँन्स केला.. :) बरा झाला.. :D त्यानंतर ज्यासाठी गेलो होतो ते कार्य (जेवण) हाती घेतलं. जेवण खरच मस्त होतं आणि अविनाश इथापेसारखा दिलदार यजमान पण होता.. :p मग भीड न बाळगता संपूर्ण भारतीय पद्धतीने जेवण झालं, लोक अगदी हाताने भात कालवून जेवली.. जेवताना सगळ्या कॉमन मित्रांच्या आठवणी, चौकशा चालू होत्या. मी आणि आम्याने आव्याला मिस केलं. जेवणानंतर ग्रामीण भागातला चहा कसा असतो ह्या औत्सुक्यापोटी एक छोटा अभ्यास दौरा केला. अभिजीत(इंग.), अमित आणि शितल ह्यांनी आनंदाने मार्गदर्शन करण्याचे मान्य केलं.. बाकी सगळं नीट पार पडलं.

आमचा आत्तापर्यंतचा गाडीचा अनुभव आणि घड्याळ बघून, आम्ही लवकर निघण्याचा निर्णय घेतला :) आता परत जायची वेळ आली. सगळ्यांचा निरोप घेवुन आम्ही तरी संध्याकाळी ५ वाजता निघालो. मधेच मामी व मेसवाल्या आंटींना पण भेटलो. आभ्यानं(गाय.) त्याचा व आव्याचा (एवढ्या वर्षांनी का होईना) मामीकडचा हिशोब मिटवला.. बरं वाटलं. थोडावेळ Kbp मधेपण फेरफटका मारला.. कॉलेजचे जुने दिवस आठवले. मग त्याही गप्पा रंगल्या. तेथे थोडेफार फोटो पण काढले. आभ्यानं(गाय.) काळोखाचेही १-२ फोटो काढले(याला फार कौशल्य लागतं राव!)… तरी बरे आले फोटो... :)

शेवटी सातारा सोडलं... अनं कधी पुणं आलं ते कळालंच नाही. आम्हाला पुण्यात सोडुन आम्या मुंबईला गेला. हुरहुर लागणं म्हणजे काय, हे कात्रजला ऊतरल्यावर कळालं. जुन्या मित्रांच्या भेटी-गाठी झाल्या ह्याचा आनंद तर होताच, पण हा दिवस एवढ्या लवकर संपला ह्याचं वाईटही वाटत होतं...

बघू परत कधी असा योग येतो… तोपर्यंत इमेल, सेलफोन आणि स्मृतीचित्रे आहेतच…!


- साग्या

February 10, 2010

A real life story...Part III

Ohh so you guys want me to end the story… You are least bothered what i feel about the situation..huh! :)
here I go…

She: I got to go..it's getting late.
(He looks into her eyes…my what moment! I would die for such a moment in my life...sounds so cute n sweet. Anyway so he looks into her eyes and says...)

He: I know you are not getting late...you are trying to run away. Don’t do that. You won’t be able to...because I have tried doing the same hell number of times...running away from you...your presence..your memories...even your smell n touch. But I failed…and now I have started understanding...how u feel.

She: Don’t you think this understanding came quite late?
(he holds her hand and says..)

He: but it's not all that late yaar! We can get back. It's just that we might have to make some extra effort…and let those efforts be such that they don’t look like efforts..:) let’s get back na…?

She: i would love to...falling in love with you was the most silly thing I did...but letting you go was worse than that. You don’t know how bad these nights have been! You'll never know..how much I love you..how much I care. You'll never know about my pain…about my broken heart. You'll never know how much I cried...just lying on my bed and thinking of you. Even the thought of you being with someone else made me shiver. But I thought you deserve someone better...someone who likes you for what you are...not like me who keeps arguing with you…who wants you to change so many things in you. But that’s just because I love you and I want you to be the best. My nagging is just a form of my love for you….. (she was about to cry…)

He: can you just stop talking..?


They both smile and look into each other's eyes...lost...lost as if there is nothing around them...! And they don’t even realize when that holding hands transformed into a tight hug...
Do I need to say anything more?...... J J